📞 8668567841
🕓 सकाळी 9:45 ते संध्याकाळी 6:15
📧 ggpchanje@gmail.com
jilha parishad
panchayat_samiti
bharat sarkar
maharashtra shasan
अधिकारी व कर्मचारी कर्तव्य तपशील
अ. क्र.पदाचे नावकर्तव्येशासन निर्णय
1 गट विकास अधिकारी 1) पंचायत समिती अंतर्गत वर्ग 3 व 4 च्या कर्मचाऱ्यांच्या स्थापना विषयक बाबी. 2) जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिनियम व ग्रामपंचायत अधिनियम संबंधित संवैधानिक कामे. 3) पंचायत समितीच्या लेखा विषयक बाबी. 4) पंचायत समितीकडे आलेल्या तक्रार अर्जांची चौकशी. 5) शासनाच्या तसेच जिल्हा परिषदेकडील व पंचायत समितीकडील विविध कामे व योजनांची अंमलबजावणी करणे. 6) ग्रामपंचायतींच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे. 7) पंचायत समितीचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961
2 सहाय्यक गट विकास अधिकारी 1) सहाय्यक गट विकास अधिकाऱ्याकडे खालील विभागांचा स्वतंत्र कार्यभार असेल: कृषी समाजकल्याण महिला व बालकल्याण पशुसंवर्धन तसेच या चार विभागांसाठी प्रथम अपीलीय माहिती अधिकारी म्हणून काम पाहतील 2) ग्रामपंचायत संबंधित कामे: पाणी शुद्धीकरण योजना नवसंजीवनी योजना हिरवे / पिवळे / लाल कार्ड नियंत्रण 3) ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक सर्व बाबी 4) तालुका मोफत कायदेविषयक सल्लागार समितीचे सचिव म्हणून काम करणे. शासन निर्णय दि. 30 ऑक्टोबर 2014
3 सहाय्यक प्रशासन अधिकारी 1) कर्मचाऱ्यांच्या कामावर नियंत्रण ठेवणे 2) दप्तरे (records) तपासणे 3) सामान्य प्रशासन कडील तपासणी मुद्दे पूर्ण करणे 4) अभिलेख वर्गीकरण करणे 5) कार्यालयीन कामांचा निपटारा जलद गतीने करणे 6) वर्ग 3 कर्मचाऱ्यांना कामासाठी मार्गदर्शन करणे कार्यालयीन कार्यपद्धती नियम पुस्तिका 1994
4 कनिष्ठ प्रशासन अधिकारी कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या कामावर नियंत्रण ठेवणे. कर्मचाऱ्यांची दप्तरे तपासणी करणे. सामान्य प्रशासन कडील तपासणी मुद्द्यांची पूर्तता करून घेणे. अभिलेख वर्गीकरण करून घेणे. कार्यालयीन कामांचा निपटारा जलद गतीने करणे. वर्ग-3 च्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यासंदर्भात आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करणे. कार्यालयीन कार्यपद्धती नियम पुस्तिका 1994. गट विकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार.
5 वरिष्ठ सहाय्यक (लिपिक) वर्ग 3 च्या कर्मचाऱ्यांचे संवर्गीय फिरती कार्यक्रम व दैनंदिन कामकाज तपासून मंजुरीसाठी सादर करणे. सेवापुस्तके अद्यावत करून त्यामध्ये सर्व नोंदी घेणे. प्रवासभत्त्याचे देयके तपासून अर्थ शाखेकडे पारित करण्यासाठी सादर करणे. पंचायत समिती सभांचे इतिवृत्त तयार करणे व इतर सभांचे कामकाज पाहणे. सेवानिवृत्ती प्रकरणे तयार करणे व सेवानिवृत्ती विषयक सर्व कामे करणे. ग्रामसेवक सभा आयोजन. सरपंच मानधन. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मानधन. मुद्रांक शुल्क/सापेक्ष अनुदान वाटप, देयके तयार करणे व वाटप करणे. वन जमीन दावे प्रस्ताव तयार करणे व पत्रव्यवहार. सरपंच/ग्रामसेवक प्रशिक्षण कार्यवाही व पत्रव्यवहार. योजना विषयक कामे व पत्रव्यवहार. कार्यालयीन कार्यपद्धती नियम पुस्तिका 1994. म.जि.प. व पं.स. (अभिलेखांचे वर्गीकरण, परीक्षण व नाशन) नियम 1964. गट विकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार.
6 कनिष्ठ सहाय्यक 1) सेवापुस्तके अद्यावत करून त्यामध्ये सर्व नोंदी घेणे. 2) प्रवासभत्त्याचे देयके तपासून सादर करणे. 3) कर्मचाऱ्यांचे प्रतिवेदन/नोंदी अद्यावत ठेवणे. 4) सेवानिवृत्ती प्रकरणे तयार करणे व संबंधित कामे करणे. 5) अनधिकृत गैरहजेरी/निलंबन/राजीनामा/कोर्ट केस प्रकरणांची माहिती तयार करणे. 6) मासिक वेतन देयके तयार करणे व वार्षिक वेतनवाढ नोंद करणे. 7) रजा मंजुरीचे प्रस्ताव पाठवणे. 8) आवक व जावक नोंदणीचे काम करणे. 9) अभिलेख वर्गीकरणाचे काम करणे. 10) समाजकल्याण विभागातील योजना व पत्रव्यवहार. 11) तगाई वसुली. 12) पाणीपुरवठा कार्यवाही व पत्रव्यवहार. 13) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कामकाज व पत्रव्यवहार. 14) संपूर्ण स्वच्छता अभियान योजना व पत्रव्यवहार. 15) शेती विभागातील योजनांचा पत्रव्यवहार. 16) पेन्शन देयके तयार करणे व इतर संबंधित कामे. 1) कार्यालयीन कार्यपद्धती नियम पुस्तिका 1994. 2) म.जि.प. व पं.स. (अभिलेखांचे वर्गीकरण, परीक्षण व नाशन) नियम 1964. 3) गट विकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार.
7 सहाय्यक लेखाधिकारी 1) गट विकास अधिकाऱ्यांकडे देयके मंजुरीसाठी सादर करणे. 2) पंचायत समितीचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे. 3) पंचायत समितीच्या खर्चाचे परीक्षण करणे. 4) महालेखाकार/स्थानिक निधी लेखा/पंचायत राज समिती कडील परिक्षण पूर्तता करणे. 5) चारमाही/आठमाही/वार्षिक अंदाजपत्रक तयार करून संबंधित विभागाकडे पाठवणे. 1) म.जि.प. व पं.स. लेखा संहिता 1968. 2) गट विकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार.
8 कनिष्ठ लेखाधिकारी 1) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे लेखे अद्यावत ठेवणे. 2) हजेरी तपासून मंजुरीसाठी सादर करणे. 3) खर्च अहवाल तयार करणे व सादर करणे. 1) म.जि.प. व पं.स. लेखा संहिता 1968. 2) गट विकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार.
9 वरिष्ठ सहाय्यक (लेखा) 1) प्रवासभत्ते/निवृत्ती वेतन देयके तपासणे व सादर करणे. 2) प्राप्त तरतूद व खर्च नोंदवहीत नोंदी घेऊन अद्यावत ठेवणे. 3) खर्च अहवाल सादर करणे. 4) लेखा विषयक पत्रव्यवहार पाहणे. 1) महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम 1981. 2) म.जि.प. व पं.स. लेखा संहिता 1968. 3) गट विकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार.
10 कृषी अधिकारी 1) कृषी विषयक विविध योजना राबवणे. 2) निविष्ठांची मागणी करणे. 3) पीक संरक्षण बाबत मार्गदर्शन करणे. 4) कृषी मेळावे आयोजित करणे. 5) लाभार्थी निवड करून प्रस्ताव सादर करणे. 6) खरीप व रब्बी हंगामात मार्गदर्शन करणे. 7) खते/बियाणे/कीटकनाशके बाबत मार्गदर्शन करणे. 1) मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958. 2) गट विकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार.
11 आरोग्य पर्यवेक्षक 1) प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन आरोग्य कार्यक्रम राबवणे. 2) आरोग्य अहवाल संकलन करणे. 3) आरोग्य विषयक सभा घेणे. 4) जन्म-मृत्यू अहवाल तयार करणे. 5) जन्म-मृत्यू दाखले देणे. 6) साथरोग नियंत्रणासाठी उपाययोजना करणे. 7) पाणी शुद्धीकरण व स्वच्छता जनजागृती करणे. गट विकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार.
12 शाखा अभियंता 1) कामांचे अंदाजपत्रक तयार करणे व मंजुरीसाठी सादर करणे. 2) कामांची पाहणी करून अंमलबजावणी करणे. 3) मोजमाप पुस्तके तयार करणे. 4) कामांचे मूल्यमापन करणे 1) जिल्हा परिषद लेखा नियम 1968. 2) गट विकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार.
13 कनिष्ठ अभियंता 1) कामांचे अंदाजपत्रक तयार करणे. 2) कामांची अंमलबजावणी करणे. 3) मोजमाप नोंदी ठेवणे. 4) कामांचे मूल्यमापन करणे. 1) जिल्हा परिषद लेखा नियम 1968. 2) गट विकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार.
14 शिपाई 1) कार्यालय स्वच्छता राखणे. 2) टपाल आणणे व पाठवणे. 3) इतर कार्यालयीन कामात सहाय्य करणे. गट विकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार.